Tuesday, 23 April 2013

विनरार काय आहे …??

विनरार म्हणजे काय .?? ते कसा वापराव  त्याचे काय फायदे आहेत .


विनरार एक असा सोफट्वेर आहे ज्याच्या सहाय्याने फ़ाइल चा आकार मोठा असेल तर लहान करता येतो . ज्याच्यानी  सहज इमेल वरून एका जागे वरून दुस-या  जागेवर पाठवणे शक्य होते . याच्यात कोणत्यापण प्रकारची फाईल उदा . JPG,PDF,EXE, वगेरे अशा फ़ाइल विनरार च्या मदतीने सोप्या पद्धतीने पाठवता येते .

जर तुम्हाला कोणती फाईल  इमेल ने पाठवायची असेल आणि जर ती १० MB साइज ची  असेल तर ती इमेल  ने जाने शक्य नसते (कारण इमेल ने आपण जास्तीत जास्त ५ MB पाठवू शकतो . )  तर तेव्हा आपण विनरार च्या मदतीने ती फाईल  कमी साइज ची करून पाठवू शकतो .

विनरार फ्री  डाउनलोड कुठून करावे .

<<<< < क्लीक करा । >>>>>>
ह्याच्या वर क्लीक  करा
आणि 5 सेकंद थांबा आणि Skip ad वर क्लिक करा आणि  डाउनलोड  करा


विनरार कसे वापरावे… ??

डाउनलोड केल्यावर सेटप इन्स्टाल  करा. नंतर पूर्ण झाल्यावर ज्या फाईली ची साइज कमी करायची असेल ती फाईल सिलेक्ट करा . आणि Add to Archive वर क्लिक करा त्यानंतर ती फाईल विनरार मध्ये कणवर्ट होईल. आणि मग ती फाइल इमेल द्वारे सेंड करा .


काही वेळा आपल्याला zip फाईल इमेल  द्वारे येते ती डाउनलोड करा . ती फाईल ओपन करण्यासाठी विनरार आवश्यक असते . ती फाईल विनरार च्या द्वारे ओपन करा.  नंतर त्या फायलीवर राईट क्लिक करून Extract here वर क्लिक करा .